शिष्यवृत्ती योजना, अधिकृत परिपत्रके, उपक्रम व समिती सदस्यांची माहिती एकाच क्लिकवर शोधा.
गावाखेड्याकडून शिक्षणासाठी जिल्ह्यासारख्या ठिकाणी येतात. तसेच प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांच्या विविध अडचणी समस्या यावरती संघटित रित्या शासन प्रशासना मध्ये समन्वय साधून उपाययोजना काढणारी एक समिती असावी. या हेतूने समितीची स्थापना झाली. भुकेल्याचे अन्न बनावे, तहानलेल्याचे पाणी बनावे, गरिबांचे छत बनावे, शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांचे पुस्तक बनावे, कमजोरांची ताकत बनावे ह्या प्रामाणिक ध्येयाला समोर ठेवून दि. २७ डिसेंबर २०२१ रोजी समितीची मुहुर्तमेढ वैभव शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी प्रा. उत्तम बलखंडे यांच्या मार्गदर्शनातून ‘विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य’ आयु. राजरत्न बलखंडे यांनी मित्रांच्या सहकार्याने स्थापन केली. “विद्यार्थ्यांचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक राजकीय विकास घडवून आणण्यासाठी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य सातत्याने काम करते. शासनाच्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या योजना प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांन पर्यंत पोहचवून शासना सोबत समन्वय साधण्यासाठी काळानुरूप प्रयत्नशील व परिवर्तनशील राहील.” ही समितीची घटना आहे, याला अनुसरून समिती वर्षभरात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थी हिताचे काम सातत्याने विविध उपक्रमांच्या माध्यमातून व तसेच आवश्यकता भासल्यास आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हक्कांचा आवाज बनते.
”विद्यार्थ्यांचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक राजकीय विकास घडवून आणण्यासाठी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य सातत्याने शासन योजना प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांन पर्यंत पोहचवून शासना सोबत समन्वय साधण्यासाठी काळानुरूप प्रयत्नशील व परिवर्तनशील राहील.”
"प्रत्येक गरजूचा आधार बनावी शिष्यवृत्ती स्वाधार"
१. महाडीबीटी व केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती अर्जांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिरे. २. सरकारी व खासगी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भोजनालय व निवास समस्यांवर आवाज उठवणे. ३. अवाजवी कॉलेज फी आकारणीविरोधात तक्रार निवारण. ४. स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणासाठी मोफत समुपदेशन.
• हजारो विद्यार्थ्यांचे थकीत शिष्यवृत्ती हप्ते मिळवून दिले. • वसतिगृह विद्यार्थ्यांच्या विद्यावेतन (Stipend) वाढीसाठी यशस्वी राज्यव्यापी पाठपुरावा. • गरजू विद्यार्थ्यांना मोफत अभ्यासाची पुस्तके व शैक्षणिक साहित्य वाटप. • डिजिटल तक्रार निवारण पोर्टलमार्फत हजारो तक्रारींचे तात्काळ निवारण.
📍 logo संदर्भात समिती अंतर्गत परीक्षणासाठी पुढील प्रश्नावली व उत्तरे 🤨- १) समितीच्या या logo चा अर्थ काय आहे ? उत्तर - प्रस्तावना - समितीचा लोगो हा अतिशय विचारपूर्वक वेगवेगळ्या समाजातील बाबींचा प्रतिकात्मक आधार घेऊन बनवण्यात आला आहे, असे निरीक्षणातून दिसून येते. यामध्ये सूक्ष्म अर्थाने प्रतीकांचा सहसंबंध जोडून पुढील पुढील बाबी दिसून येतात त्यामध्ये खालून विचार केला तर... 1) संविधानाची प्रतिकृती म्हणून असलेले बुक समिती एकूणच संविधानाला अनुसरूनच लोकशाहीला पूरक कार्यपद्धतीनेच नियमावली बनवून काम करते, लेखाजोखा ठेवते व सत्याला वाचा फोडून अन्यायावर वार लेखणीच्या माध्यमातून समिती नेहमी करेल असे दिसते. 2) हिरा - वरील संविधानाला अनुसरून प्रतिभेने चकाकणारे हिरे घडावेत असे दर्शविणारी लेखणीचे टोक दिसते. 3) मदतीचे दोन हात - नेहमीच समिती अस्थिर विद्यार्थ्यांना स्थिरतेचा आधार देण्यासाठी तत्पर असल्याचे दिसते. 4) पक्षी (कबूतर) - समितीत शिका, संघटित व्हा, संघर्ष करा ह्या क्रांतीच्या विचारांचा बाळकडू घेऊन क्रांती घडवून आणण्याकरिता विचारांची समाजात देवांना घेवाण करणारे पक्षी कबुतर हे विद्यार्थ्यांची भूमिका दर्शवतात. 5) समितीचे नाव - व्यापक अर्थाने समिती मूळ आंबेडकरी विचारांची असल्याची व विश्वात ख्याती असल्याल्या बाबासाहेबांच्या नावाला केंद्रस्थानी ठेऊन नाव - विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती असे नाव दिसते. 6) समितीचे कार्यक्षेत्र - महाराष्ट्र राज्य दिसून येते. 7) ब्रीदवाक्य - "विद्यार्थी कल्याणातून समाज कल्याणकडे", या समितीच्या ब्रीडवाक्यातून समाजातील learning age मधील वर्गाच्या प्रश्नांची पूर्तता संघटित रित्या झाली तरच समाजाचे कल्याण होईल असा व्यापक दृष्टिकोन दिसून येतो. 8) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास अवस्थेतील फोटो - फोटो हा बाबासाहेबांची विदवत्ता उलगडणारा व शिका, संघटित व्हा आणि वेळ आल्यास संघर्ष करण्याची तयारी ठेवा असा, क्रांतिकारी संदेश अमलात आणण्याची विद्यार्थ्यांकडून अपेक्षेने बघणारे बाबासाहेबांचे डोळे दिसत आहेत, त्यासाठी त्यांनी कायद्याने लेखणीला अस्त्र व वेळेनुसार लेखणीलाच शस्त्र बनवावे असा बोध देणारा फोटो दिसतो. म्हणजेच लेखणीतून सत्याला वाचा फोडून अन्यायावर वार करण्याचे काम केले पाहिजे असे बाबासाहेबांच्या हातातील लेखणीला पाहून लक्षात येते. तसेच राहणीमानातील रुबाब व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे देऊन जातो. 9) Degree apron cap - उच्च सुशिक्षित असा बुद्धिजीवी वर्गाचा फौज तयार करणे. 10) घर - गरजूं अडचणीतील विद्यार्थ्यांचा एक हक्काचा निवारा म्हणजे ते घर दिसते. 11) खिडकी - कालानुरूप परिवर्तनशील विचारांचा प्रकाश विद्यार्थ्यांसाठी असलेल्या हक्काच्या समितीच्या घरात निवाऱ्यात पडण्यासाठी खिडकी दर्शविली आहे. 12) उलटे बुक - समाजातील रखखत्या उन्हा सारख्या वाढत चालेल्या द्वेषापासून विद्यार्थ्यांला आपल्या पुस्तकं रुपी ज्ञानाच्या सावलीत विसावा घेता आला पाहिजे, असा अर्थ बोध लक्षात येतो. 13) स्टिकर नोट बुक - कोणताही बूक वाचताना टप्याटप्याने वाचावे, तरच त्याचे अर्थायोग्य पूर्ण वाचन करता येते! याप्रमाणे कोणत्याही कामाचे नियोजन करून टप्याटप्याने त्याची पूर्तता करावी. यासाठी स्टिकी नोट असलेलं पुस्तक वापरण्यात आल्याचं दिसतंय. 14) रुपया - स्वावलंबमातून परावलंबन ह्या उद्देशाने समिती स्वतःची एक अर्थ व्यवस्था बनवेल व उगवत्या सुर्यासारखं गरजू विद्यार्थ्यांसाठी आर्थिक आधार बनत चालक-मालक बनून अभ्यासाला आर्थिक मदत उभी करण्यास प्रयत्नशील राहील, संघटनात्मक कार्य करताना तन-मन यासोबत धनाचीही आवश्यकता असते. म्हणून तो रुपया घरामध्ये म्हणजे समिती मध्ये जाताना दिसत आहे. व अर्थचक्र परिणाम स्वरून उगवताना सुद्धा दिसत आहे. 15) पोडियम - विद्यार्थ्यांच्या कला-कौशल्याना वाव देण्यासाठी व एकमेकांना अवगत असलेल्या माहितीच्या/ विचारांच्या देवाणघेवानीसाठी हक्काचं 24 तास चालू असलेलं नाण्याच्या दोन्ही बाजू ज्याप्रमाणे लक्षात घेऊन विचार स्पष्ट करण्यासाठी विचारपीठ निर्माण करण्याचे प्रामुख्याने समिती कार्य करेल, असे दिसून येते. 16) logo चा पृष्ठभाग - हा गोल्डन रांगोळी सारख्या जाळी सारख backgound दिसते, ते समितीच टीमवर्क प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांन पर्यंत पोहचण्यासाठी वाढत जात आहे स्पष्ट करते. 17) गोल आकाराचा लोगो - पृथ्वी ला प्रतिबिंबित करतो. 18) निळ्या रंगाची कडा - समितीचे कार्य पृथ्वी वरील सागरा प्रमाणे अथांग होत जावो. 19) क्रियेटर्स साईन - logo कुणी बनवला आहे, हे क्रीयेटर च्या सांकेतिक sign वरून कळते. 20) VHSR watermark - logo चा वापर चुकीच्या ठिकाणी होऊ नये म्हणून फिकट रंगात VHSR असे लिहिले आहे. ---------------------------------------------- २) logo चे महत्व काय असते ? उत्तर - - कोणत्याही संघटनात्मक कृतीचा लेखी चेहरा हा त्या संघटनेचा logo असतो, logo समितीची कार्यपद्धती व कार्यकुशलतेचा दर्जा काय असू शकतो हे दर्शवते. Logo एकूणच ओळख म्हणून काम करतो. - logo विना काम करणे म्हणजे संघटनेला चेहरा नसल्यासारखे होते. - First impression last impression ह्या शब्द प्रयोगातील गंभीरतेप्रमाणे first impression हे logo असते. ३) माझी समितीच्या पदाधिकारी पदी निवड होऊन एक महिना होत आहे, मी पदाच्या व्यतिरिक्त समिती प्रभावी बनण्यासाठी खरंच इनपुट देतोय/देतीये का ? उत्तर - (हा प्रश्नच कुणालाच कळला नाही) - समिती मध्ये एकता व अनुशासन कसे राहावे यासाठी काही उपाय सुचवतो. - समिती मार्फत वेगळ्या प्रकारचे उपक्रम कसे राबवू शकतो याबाबत सूचना देणे किंवा फक्त सूचना न देता आराखडा देतो. - कार्यालयीन कामकाजात दिरंगाई होऊ न देण्यास उपाययोजना शोधणे व त्या अमलात आणतो - समितीचे अहवाल व प्रस्ताव कसे नाविन्यपूर्ण- आकर्षक असू शकतील याबाबत सूचना किंवा आराखडा देतो. - समितीची सभासद संख्या सभासद संख्या वाढवण्यासाठी काय उपक्रम राबवता येतील यासाठी सूचना किंवा आराखडा देतो. - पदाधिकाऱ्यांमध्ये bonding वाढावी यासाठी सूचना किंवा आराखडा देतो, किंवा प्रयत्न करतो. - समिती अंतर्गत कोणकोणते खेळते व्यवसाय निर्माण केले जाऊ शकतील याबाबत सूचना किंवा आराखडा देतो. - राजकीय पुढाऱ्यां कडून समितीला आर्थिक मदत उभी करण्यासाठी माझ्याकडे हा आराखडा आहे. - विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याच्या पध्दतीवर अभ्यास असा आहे. - काम करताना राजकीय डावपेचांची महिती सर्वांना देण्याच काम करतो. - समितीतील नकारात्मक गोष्टी चे निरीक्षण करून त्या सोडवण्यासाठी सकारात्मक आराखडा तयार करतो. - दरवेळी माध्यम मार्ग सुचवतो.